Breaking News

राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा; भव्य पारितोषिके

मुंबई ः श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 21वी राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. सर्वांत मोठ्या बक्षीस रकमेची म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते.
या स्पर्धेत राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाला प्रथम पारितोषिक 75 हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय 50 हजार रु. व सन्मानचिन्ह, तृतीय 25 हजार रु. व सन्मानचिन्ह आणि बालकांसाठीच्या उत्कृष्ट दिवाळी अंकास 15 हजार रु. अशी भरघोस रकमेची पारितोषिके देण्यात येतील तसेच उत्कृष्ट कथा, कविता, व्यंगचित्र व विशेष विषयांवरील अंकालाही दोन ते पाच हजार रुपयांची रोख पारितोषिके दिली जातील.
खास रायगड जिल्ह्यातून प्रकाशित होणार्‍या उत्कृष्ट दिवाळी अंकाला प्रथम पारितोषिक 20 हजार रु. व सन्मानचिन्ह, द्वितीय 10 हजार व सन्मानचिन्ह, तृतीय पाच हजार रु. व उत्तेजनार्थ अंकास दोन हजार रु.  अशी पारितोषिके देण्यात येतील.
या स्पर्धेत ज्यांना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी आपल्या दिवाळी अंकाच्या दोन प्रती व प्रवेश शुल्क 100 रु. रोख, धनादेश अथवा डीडीद्वारे 31 डिसेंबरपूर्वी मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, आझाद मैदान, महापालिका मार्ग, सीएसटी, मुंबई 400001 (फोन : 022-22620451) आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, प्लॉट नं. 475, मार्केट यार्ड, पनवेल, जिल्हा रायगड 410206. (फोन 022-64529525) या पत्त्यावर पाठवावेत. धनादेश किंवा डीडी मुंबई मराठी पत्रकार संघ या नावाने काढावा, असे आवाहन स्पर्धेचे संयोजक दीपक म्हात्रे यांनी केले आहे.

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply