Breaking News

पनवेल मनपाचे तळोजामध्ये वृक्षारोपण

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षण 2022 आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत तळोजा येथील सेक्टर 21 मध्ये शुक्रवारी (दि. 10) वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमांध्ये वृक्षारोपणाबरोबरच ‘माझी वसुंधरा’ची शपथ सर्वांनी मिळून घेतली.

या कार्यक्रमास तळोजा गावातील नागरिक तसेच प्रभाग अधिकारी, पालिका कर्मचारी उपस्थित होते. या वेळी उपस्थित नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सर्व परिसराची स्वच्छता केली.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply