खारघर : रामप्रहर वृत्त
भारताचे पहिले रक्षा प्रमुख चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत व त्यांच्या सहकार्यांचे 8 डिसेंबर 2021 रोजी अपघाती निधन झाले. त्यांना व त्यांच्या सहकार्यांना भारतीय जनता पक्ष खारघर परिवाराकडून खारघर सेक्टर 13 येथील जनसंपर्क कार्यालयात आदरांजली वाहण्यात आली.
या वेळी नगरसेवक शत्रुघ्न काकडे, नगरसेविका नेत्रा पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील, मंडल सरचिटणीस दीपक शिंदे, सोशल मीडिया सह संयोजक मोना अडवाणी, जिल्हा चिटणीस गीता चौधरी, उपाध्यक्ष दिलीप जाधव, बिना गोगरी, शिक्षक सेल संयोजक संदीप रेड्डी, वैद्यकीय सेल संयोजक किरण पाटील, नमो नमो अध्यक्ष संतोष शर्मा, उद्योग आघाडी सह संयोजक प्रशांत दुदाम, वैद्यकीय विद्यार्थी आघाडी संयोजक विजय उजळंबे, उत्तर भारतीय सह संयोजक सुमित सहाय, अंशुल हेडावू, संदीप कासार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.