Breaking News

मंत्री राऊतांनी केलेला प्रशासनाचा गैरवापर काँग्रेसला मान्य आहे का?

विक्रांत पाटील यांचा राहूल गांधींना पत्राद्वारे सवाल

पनवेल : वार्ताहर

युवक काँग्रेसच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी प्रशासकीय यंत्रणांचा केलेला गैरवापर काँग्रेसला मान्य आहे का, असा सवाल भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी काँग्रेस नेते खासदार राहूल गांधींना पत्राद्वारे सवाल केला आहे.

विक्र्रांत पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्वतःचा मुलगा कुणाल राऊत याला युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडून आणण्यासाठी पदाचा गैरवापर करून महावितरणचे सरकारी अधिकारी कामाला लावले. नवी मुंबईत गुजरात भवन येथे 6 डिसेंबर 2021 रोजी याबाबत सुरू असलेल्या एका बैठकीत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आम्ही थेट धडक देऊन या प्रकरणाची पुराव्यानिशी पोलखोल केली आहे. तसेच महावितरणच्या संबंधित अधिकार्‍याला याविषयी स्पष्ट जाब विचारण्यात आला व त्या प्रसंगाचे व्हिडिओ चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रक्षेपित करण्यात आले आहे. या प्रकरणातील पुराव्यांची दखल तुम्ही घ्यावी. कारण ही निवडणूक युवक काँग्रेसची अंतर्गत निवडणूक आहे व त्यात तुमचा आदर्श (?) डोळ्यासमोर ठेवून चालणार्‍यांनी केलेले उपद्व्याप तुमच्या नजरेस आणून देणे अगत्याचे वाटते.

सर्वसामान्य माणसाला संधी देऊ असे म्हणणार्‍या काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीतही केवळ मंत्र्यांच्या चिरंजीवांनाच निवडून आणले जाऊ शकते का, असा प्रश्न या प्रकरणाने उपस्थित केला आहे. तसेच नितीन राऊत साहेब तुम्हाला मोबदला देतील, काम व्यवस्थित न झाल्यास तुम्हाला अडचणी येतील अशा प्रकारे संबंधित अधिकारी कंत्राटदारांना उद्देशून बोलत होते त्यामुळे हे प्रकरण भ्रष्टाचाराशीदेखील संबंधित आहे. जर युवक काँग्रेसच्या निवडणुकीसाठी इतके भयंकर प्रकार होत असतील तर प्रत्यक्ष निवडणुकीत राऊत काय पातळी गाठू शकतात याची कल्पना केली जाऊ शकते. म्हणून आपण आपल्या पक्षातील या गैरप्रकारांची दखल घेऊन, पक्षाचे वरिष्ठ या नात्याने नितीन राऊत यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची सूचना करावी.

सरकारी यंत्रणांचा गैरवापर व पैशाच्या देवाणघेवाणीतून होणारी ही अशीच निवडणूक पद्धती तुम्हाला अभिप्रेत आहे का, असल्यास आपल्याला शुभेच्छा! नसल्यास आपण नितीन राऊतांवर कारवाई कराल ही अपेक्षा.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply