Breaking News

सीकेटी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालयात शनिवारी (दि. 11) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संस्थेचे स्फूर्तिस्थान स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता.
संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईतील डीएव्ही कॉलेजचे प्राचार्य आणि मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ. अजय भामरे, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव सुधीर पुराणिक, तर प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, महापौर डॉ. कविता चौतमोल, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य नगरसेवक अनिल भगत, नगरसेवक संतोष शेट्टी, एकनाथ गायकवाड, नगरसेविका सीता पाटील, हेमलता म्हात्रे, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे आदी उपस्थित होते.
या वेळी प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करताना आयुष्यात खूप मोठे व्हा. संधी तुमचा दरवाजा एकदाच ठोठावते. त्याचे सोने करा, असे आवाहन केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणात पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यात पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी सर्व पालक व गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी कौतुक केले. सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. आर. व्ही. येवले, प्रा. डॉ. जी. एस. तन्वर, प्रा. ए. व्ही. पाटील यांनी केले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी परिषद व विद्यार्थी कल्याण कक्षाच्या अध्यक्ष डॉ. एम. ए. म्हात्रे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बी. डी. आघाव यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

पनवेलमध्ये शनिवारी युवा निर्धार मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल विधानसभेच्या वतीने शनिवारी (दि. 26) सायंकाळी …

Leave a Reply