Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गाढी नदीवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास होत असून, विकास कामांचा झंजावात सुरू आहे. त्याअंतर्गत सुकापूर ते देवद या गाढी नदीवरील पुलाचे काम सुरू झाले आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 13) झाले.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, प्रकल्पाच्या सुरुवातीबरोबर येणार्‍या कालावधीमध्ये सिडको आणि नैनाने जर सकारात्मक भूमिका घेतली, तर परिसरातील नागरिक या नियोजनबद्ध विकासाला प्रतिसाद देतील. तसेच नागरिकांच्या विकासकामांबाबत सिडकोबरोबर चर्चा करू आणि गरज भासली, तर संघर्ष करून परिसराच्या, नागरिकांच्या हितासाठी काम करावे लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून या परिसरातील नागरिकांचे पाठबळ लाभेल, अशी खात्रीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी व्यक्त केली.
सिडकोच्या नैना प्राधिकरणाचा 10 कोटी 11 लाख 44 हजार रुपयांचा निधी वापरून सुकापूर ते देवद या मार्गावरील गाढी नदीवर पूल उभारण्यात येणार आहे. सुकापूर येथील गंगा गणेश सोसायटीजवळील गणेश विर्सजन घाटाजवळ या कामाचा भूमिपूजन सोहळा सोमवारी झाला.
या सोहळ्याला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, पनवेल महापालिकेचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, प्रभाग समिती सभापती सुशिला घरत, नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे, जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, सुकापूर सरपंच योगिता पाटील, देवद सरपंच शीतल सोनावणे, युवा मोर्चा ग्रामीण अध्यक्ष आनंद ढवळे, ज्येष्ठ कार्यकर्ते वामन म्हात्रे, अ‍ॅड. जितेंद्र वाघमारे, माजी उपसरपंच बुवा भगत, विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, ज्ञानेश्वर पाटील, युवा नेते यतीन पाटील, सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील, सरचिटणीस उदय म्हस्कर, महेश केणी, युवा मोर्चाचे आत्माराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, दिनेश भगत, पुष्पा म्हस्कर, अनिता पाटील, पूनम भगत, कविता पोपेटा, ज्योती केणी, विनोद वाघमारे, दिनेश वाघमारे, युवा नेते संदीप वाघमारे, निलेश वाघमारे, अविनाश गायकवाड, प्रमोद भगत, दीपक भगत, साजीद सय्यद आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply