Breaking News

उरण मार्गावर स्टेशन बांधकामांना वेग

नागरिकांकडून आनंद व्यक्त

उरण : रामप्रहर वृत्त

जासई, रांजणपाडा, जेएनपीटी (नवघर), द्रोणागिरी (बोकडविरा) व उरण शहर या रेल्वे स्थानकांच्या बांधकामांना वेग आला आहे. स्थानकात फलाटे तयार झाली असून रेल्वे मार्गही बसविण्यात आले आहे. यातील रांजणपाडा स्थानकाच्या छपराचेही काम अंतिम टप्प्यात आले आहे.

उरणमध्ये रेल्वे सुरू व्हावी अशी मागणी येथील नागरिक अनेक वर्षांपासून करीत होते हे नागरिकांचे स्वप्न पूर्णत्वास जात आहे. त्यामुळे नागरिकांकडून आनंद व्यक्त केले जात आहे. बेलापूर (सीवूड) ते उरण या प्रलंबित रेल्वे मार्गावरील जासई ते उरणदरम्यानच्या स्थानकांच्या उभारणीचे काम वेगाने सुरू झाले आहे. यापैकी काही रेल्वेस्थानकांच्या नव्या नावाची मागणीही स्थानिक करीत आहेत, मात्र 1997पासून प्रलंबित असलेली रेल्वेसेवा दृष्टिक्षेपात असल्याने नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

उरण तालुक्याला नवी मुंबईला जोडण्यासाठी नवी मुंबईतील बेलापूर ते उरण हा 27 किलोमीटरचा रेल्वे मार्ग प्रस्तावित होता. या मार्गावरील सीवूड्स ते उलवे नोडमधील खारकोपर ही सेवा सुरू झाली आहे, मात्र गव्हाण ते जासई मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने हा मार्ग रखडला होता. भूसंपादनाची समस्या मार्गी लागली असल्याने जासई ते उरणदरम्यानच्या रेल्वे मार्गावर येणार्‍या रेल्वेस्थानकांच्या कामाला वेग आला आहे.

दरम्यान, काही रेल्वेस्थानकांच्या नामकरणाबाबत भूमिपूत्रांकडून मागण्या केल्या जात आहेत. त्यामुळे हा मुद्दा येत्या काळात पुढे येऊ शकतो.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply