Breaking News

सेवानिवृत्त शिक्षकांनी आनंदी जीवन जगावे -सी. पी. पाटील

पेण : प्रतिनिधी

जगामध्ये पैसा हा सर्वस्वी नाही. पैसा हा जगण्यापुरता पाहिजे. घराच्या बाहेर पडून सेवा करा, दुसर्‍याला आनंद द्या. तुम्ही शेवटपर्यंत आनंदात रहाल, असे प्रतिपादन निवृत्त गटविकास अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी पेण येथे केले. महाराष्ट्र सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक व कर्मचारी संघाची सभा नुकतीच पेणमधील आगरी समाज सभागृहात संघटनेचे उरण तालुकाध्यक्ष अभिमन्यू गावंड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी निवृत्त गटविकास अधिकारी सी. पी. पाटील व त्यांच्या पत्नी विद्या पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सी. पी. पाटील सत्काराला उत्तर देत होते. सेवानिवृत्त शिक्षकांनी आनंदी जीवन जगावे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास बस्वदे यांनी यावेळी सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रलबिंत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन र. ना. ठाकूर यांनी केले. संघटनेचे प्रदेश सरचिटणीस कल्याण लवांडे, जिल्हाध्यक्ष ग. वि. म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस प्र. रा. म्हात्रे, ना. श्री. पाटील, बडोदा बँकेचे अभिषेक गुप्ता यांच्यासह सेवानिवृत्त शिक्षक या सभेला उपस्थित होते.  प्र. रा. म्हात्रे यांनी आभार मानले.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply