Breaking News

महावितरणचा कर्जत गुंडगे येथील ट्रान्सफॉर्मर ठरतोय अपघाताला आमंत्रण देणारा

कर्जत : प्रतिनिधी

नगर परिषद हद्दीतील गुंडगे प्रभागातील गजानन पार्क या गृहनिर्माण संकुलाशेजारी असलेला महावितरणचा ट्रान्सफॉर्मर धोकादायक ठरत आहे. रहदारीचा अर्धा रस्ता व्यापलेल्या या ट्रान्सफॉर्मरमुळे अपघाताची व जीवितहानीची शक्यता आहे. वारंवार तक्रारी करूनही वीज वितरण कंपनी व कर्जत नगर परिषद या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने संबंधित कार्यालयाविरोधात नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. हा जीवघेणा ट्रान्सफॉर्मर तेथून हलवावा, अशी मागणी छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटनेने केली आहे. कर्जत नगर परिषदेने एमएमआरडीएच्या निधीतून नुकताच गुंडगे प्रभागातील हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा  बनविला आहे. मात्र त्यावेळी रस्त्यात बाधित असलेले विजेचे खांब व ट्रान्सफॉर्मर नवीन ठिकाणी हलविण्याचा खर्च गृहीत धरला नसावा. त्यामुळे रस्ता तयार होऊनही अद्यापी हा ट्रान्सफॉर्मर तिथेच आहे. येथे शेजारीच गजानन पार्क हे रहिवासी संकुल असल्याने लहान मुले खेळताना या ठिकाणी जाऊ शकतात. ट्रान्सफॉर्मरचा प्रसंगी स्फोट झाल्यास जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने हा ट्रान्सफॉर्मर ताबडतोब येथून हलविणे गरजेचे आहे.

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply