Breaking News

सुधागड पालीत ग्रामसुरक्षा दलाची स्थापना

पाली : रामप्रहर वृत्त

रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यंवशी यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 15) पाली पोलीस ठाण्यात ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे सुधागड तालुक्यात आता पोलिसांच्या मदतीला ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य असणार आहेत. ग्रामसुरक्षा दलासाठी यावेळी सुधागड तालुक्यातील युवकांची निवड करण्यात आली. निवडलेल्या सदस्यांना पोलीस ठाण्याच्या वतीने ग्रामसुरक्षा दलाचा लोगो असलेले कपडे व इतर साहित्य देण्यात आले. यावेळी किरणकुमार सूर्यवंशी यांनी उपस्थित ग्रामसुरक्षा दलातील सदस्यांना कायदेशीर मार्गदर्शन व ग्राम संरक्षक पथकाचे स्थापनेचे उद्दिष्ट रचना व कार्य समजावून सांगितले. पाली पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्‍या सर्वच गावांत ग्रामसुरक्षा दल स्थापन केले असल्याचे पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी सांगितले. यावेळी पोलीस हवालदार प्रफुल्ल चांदोरकर, पोलीस नाईक शेडगे यांच्यासह ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

ग्रामसुरक्षा दलाच्या जबाबदार्‍या

रात्रीच्या वेळी गावात गस्त घालणे, नागरिक व पोलिसांची मदत करणे, वाहन अपघातात तातडीने मदत करणे, नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करणे, मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमून दिलेले काम करणे, वाहतूक कोंडीच्या वेळी मदत मागितल्यास पोलीस दलाला मदत करणे, साथरोगाच्या कार्यालयात मदत मागितल्यास कर्तव्य बजावणे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply