Breaking News

अलिबागचे पोलीस ठाणे होणार बालस्नेही

अलिबाग : प्रतिनिधी

येथीले पोलीस ठाणे लवकरच बालस्नेही होणार आहे. बालकांच्या तक्रारी निराकरण, गुन्ह्यात अडकलेल्या बालकांचे पुनर्वसन आणि समुपदेशन करण्याचा प्रयत्न या बालस्नेही पोलीस केंद्रामार्फत केला जाणार आहे. कोकणात पहिल्यांदाच ही संकल्पना पोलिसांच्या माध्यमातून राबविली जाणार आहे.

अलिबाग पोलीस ठाण्याच्या समोरील भागात या बालस्नेही पोलीस केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. आकर्षक रंगसंगती आणि भिंतीचित्रे साकारून या केंद्राची सजावट करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच प्रायोगिक तत्वावर ही संकल्पना राबविण्यात येत आहे. पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणार्‍या अल्पवयीन मुलांत सुरक्षितेची भावना निर्माण व्हावी, या दृष्टीने या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. पोलीस दलातील साचेबध्द कामकाजाला काही प्रमाणात फाटा देऊन व सामाजाभिमूख दृष्टीकोन समोर ठेऊन या केंद्राचे काम होणार आहे.

अल्पवयीन मुलांच्या तक्रारीचे निवारण, त्यांचे समुपदेशन, गुन्ह्यात अडकलेल्या अल्पवयीन मुलांचे पुनर्वसन या केंद्राच्या माध्यमातून केले जाणार आहे. बालकांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढू नये, यासाठी हे केंद्र प्रयत्नशील राहणार आहे. या केंद्रासाठी पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांबरोबरच, सामाजिक संस्था, मनसोपचार तज्ज्ञांची मदतही घेतली जाणार आहे.

यापुर्वी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात बालस्नेही पोलीस केंद्राची संकल्पना राबविण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे पहिल्यांदाच प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या बालस्नेही केंद्राचे लवकरच लोकार्पण केले जाईल. बालकांच्या तक्रारींचे निवारण यामाध्यमातून होईल.

-के. डी. कोल्हे, निरीक्षक, अलिबाग पोलीस ठाणे

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply