Breaking News

पनवेलमधील नेरे-मालडुंगे रस्त्याचा होणार विकास

मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे पनवेल तालुक्यातील नेरे ते मालडुंगे रस्ता सुधारणेचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार
प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 10) झाले.
मालडुंगे येथे झालेल्या या भूमिपूजन समारंभास पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, हॅप्पी सिंग, वाजे ग्रामपंचायतीच्या सरपंच मथुरा पाटील, उपसरपंच गणेश पाटील, माजी सरपंच राजेश भोईर, रेवण पाटील, माजी उपसरपंच राजेश भालेकर, सदस्य श्याम भालेकर, पदू वाघ, मालडुंगे ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा चौधरी, विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, मदन पाटील, राघो पाटील, रूपेश भोईर, गणेश पाटील, काळूराम वाघ, विकास भगत, गणेश शीद, जोमा निरगुडा, रामा, जनार्दन निरगुडा, दिलीप पाटील, संजय जाधव, दिनेश मानकामे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

महायुतीचे उमेदवार बारणेंच्या विजयाचा निर्धार

पनवेल प्रभाग क्रमांक 20मध्ये प्रचाराचा शुभारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त …

Leave a Reply