Breaking News

नवी मुंबई ते पेण नमुंमपाची बस सुरू व्हावी

भाजप जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे यांची मागणी

पेण : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील अनेक नागरिकांना नोकरी किंवा कामानिमित्त मुंबईमध्ये जावे लागते. एसटी संपाच्या काळात खाजगी वाहनांमधून त्यांना प्रवास करावा लागत आहे. यामुळे अधिक भाडे व वेळेचा अपव्यय होत असल्याने नवी मुंबई ते पेण अशी नवी मुंबई पालिकेची बस सेवा सुरू व्हावी, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे व भाजपचे जिल्ह्यातील सर्व आमदार यांच्याकडे भाजप जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे यांनी पत्राद्वारे केली आहे.

मुंबईमध्ये नागरीकरण, औद्योगिकीकरण याचा विचार करता आजमितीस तिसर्‍या मुंबईची पनवेल अंतर्गत रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होण्यास सुरुवात झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत अनेक नागरी सुविधा निर्माण केल्या. यामध्ये वाहतूक व अन्य मूलभूत सुविधा यांचा समावेश आहे.

नुकतीच नवी मुंबई महानगरपालिकेने नवी मुंबई (वाशी) ते कर्जत आणि खोपोली त्याचबरोबर बेलापूर रेल्वे स्टेशन ते कर्जत आणि खोपोली अशी प्रवासी वाहतूक व्यवस्था सुरू केली आहे. गेले अनेक दिवस संपूर्ण राज्यामध्ये एसटीचा संप सुरू आहे. अनेक नागरिकांना व्यवसायासाठी, नोकरीसाठी शिक्षण घेण्यासाठी पनवेल, नवी, मुंबई, बेलापूर, नेरूळ, या ठिकाणी जावे लागते. गेले काही दिवस एसटी बंद असल्याने खाजगी प्रवासी वाहतूक करणारे लूट करत आहेत. निश्चितच यापुढील काळात नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पेण रेल्वे स्टेशनपर्यंत प्रवासी बस व्यवस्था सुरू झाल्यास त्याचा उपयोग रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना होऊ शकतो. कारण पेण हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा ओळखून आपण एनएमएमटीच्या माध्यमातून प्रवासी बस वाहतूक सेवा सुरू झाली तर नागरिकांना सोयीस्कर होईल. यामध्ये स्थानिक आमदार रविशेठ पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी मंत्री गणेश नाईक यांनी जातीने लक्ष दिल्यास लवकरच ही सेवा नागरिकांसाठी सुरू होईल, अशी अपेक्षा बंडू खंडागळे यांनी व्यक्त केली.

Check Also

आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी …

Leave a Reply