Breaking News

पनवेलमध्ये नाट्य उत्सवाला प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त

मानवता, समता, न्याय, संविधान, शांती आणि लोककल्याणाची गाज असणार्‍या थिएटर ऑफ रेलेवन्सचे 18 व 19 डिसेंबरला दोन दिवसीय वैचारिक नाट्य उत्सव पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाले.

या नाट्य उत्सवाचे पाहिले नाट्यपुष्प मंजुल भारद्वाज दिग्दर्शित नाटक सम्राट अशोक हे 18 डिसेंबरला प्रस्तुत झाले. धनंजय कुमार यांच्या लेखणीतून साकार झालेल्या या नाटकात मंजुल भारद्वाज यांनी सम्राट अशोक चरित्र साकारले होते. तर नाटकाने  दिग्दर्शन धनंजय कुमार यांनी केले होते. अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर,

कोमल खामकर, सुरेखा साळुंखे यांनी या नाटकात काम केले.

दुसरे नाट्यपुष्प 19 डिसेंबरला मंजुल भारद्वाज लिखित-दिग्दर्शित नाटक लोक-शास्त्र सावित्री हे झाले. यामध्ये साक्षी खामकर, प्रियांका कांबळे, तुषार म्हस्के, नृपाली जोशी, सुरेखा साळुंखे आणि संध्या बाविस्कर हे कलाकार होते.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply