मुंबई ः प्रतिनिधी
प्रो-कबड्डी लीग 2021 स्पर्धा 22 डिसेंबरपासून सुरू होत आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी ही लीग होऊ शकली नव्हती. त्यानंतर यंदा ती बंगळुरू येथे खेळली जात आहे. यामध्ये एकूण 12 संघ सहभागी होत असून सामने प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत, परंतु प्रेक्षक टीव्हीवर त्याचा आनंद घेऊ शकतात. प्रो-कबड्डी लीगमध्ये दररोज दोन ते तीन सामने खेळले जातील. तिन्ही सामन्यांची वेळ वेगळी असेल. पहिला सामना संध्याकाळी 7.30 वाजता, दुसरा सामना 8.30 वाजता आणि तिसरा सामना रात्री 9.30 वाजता खेळवला जाईल. पहिल्या दिवशी बंगळुरू बुल्स विरुद्ध यू मुंबा, तेलुगु टायटन्स विरुद्ध तामिळ थलायवास आणि बंगाल वॉरियर्स विरुद्ध यूपी योद्धा यांच्यात तीन सामने होतील. प्रो-कबड्डी लीगचा आठवा हंगाम स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या सर्व चॅनेलवर पाहता येईल. डिस्ने प्लस आणि हॉटस्टार या अॅप्सवरही तुम्ही सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. ही स्पर्धा 20 जानेवारीपर्यंत खेळवली जाणार असून ती रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. स्पर्धेत प्रत्येक संघात 12 खेळाडू असतात, परंतु सात खेळाडू कोर्टवर खेळतात. पाच खेळाडू सुरक्षित असतात जे विशेष परिस्थितीत वापरले जातात.