बोलेरो पिकअप वन विभागाकडून जप्त
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/07/bhandivali-1024x500.jpg)
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/07/bhandivali2-1024x501.jpg)
माणगाव ः प्रतिनिधी
माणगाव तालुक्यातील भांडीवली येथील कालभैरव मंदिराजवळ खैराच्या लाकडांनी भरलेली बोलेरो पिकअप क्रमांक (एम.एच.-06-बी डब्लू-2207) ही गाडी पकडण्यात आली असून ही घटना सोमवारी (दि. 22) सायंकाळी 7.15ला घडली. वनक्षेत्रपाल रोहा पथकाचे आय. एस. कांबळी, वनपाल अशोक रैराशी, वनरक्षक अजिंक्य कदम, वाहनचालक बंटी वारंगे या पथकामार्फत संयुक्त कारवाई करण्यात आली असून या खैराच्या लाकडांची शासकीय किंमत 11432 रुपये असल्याची या पथकाकडून माहिती देण्यात आली. या गाडीचा मालक व वाहनचालक नबील बशीर उबारे व या गाडीमध्ये माल भरणारा सोहेल सलीम मुरुडकर दोघेही रा. आंबेत यांना चौकशीसाठी वनविभाग रोहा यांनी ताब्यात घेतले आहे.