पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथील देवसागर साधक समाज श्री स.स. बाळकृष्ण महाराज आध्यात्मिक ज्ञानमंदिर येथे मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी ते दत्त जयंतीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, शकुंतला ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख यांच्यासह इतर मान्यवरांनी भेट देऊन दर्शन घेतले.
श्री बाळकृष्ण महाराजांच्या पादुकांचे पूजन आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याने सप्ताहाचा प्रारंभ झाला. सप्ताहादरम्यान भजन, प्रवचन, कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बाळकृष्ण महाराजांच्या 125व्या जयंतीनिमित्त दिंडी सोहळा झाला, तर श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजनदेखील करण्यात आले होते. माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि अर्चना ठाकूर यांच्या हस्ते ही पूजा झाली.
या सप्ताहावेळी भरत ठाकूर, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, माजी उपरपंच विजय घरत, माजी नगरसेवक अनिल भगत, संजय भगत, विनोद म्हात्रे, माजी पं.स. सदस्य रत्नप्रभा घरत, भाजप पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्यासह अन्य मान्यवर, ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते. हा सप्ताह 5 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
Check Also
भारत टॅक्सी सेवा प्रवासी आणि चालकांसाठी नवा अध्याय -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पनवेल ः रामप्रहर वृत्तसहकारी तत्त्वावरील भारत टॅक्सी सेवा प्रवासी आणि चालकांसाठी एक नवा अध्याय असून …
RamPrahar – The Panvel Daily Paper