Breaking News

हुश्श… तब्बल सहा दिवसांनी रोहेकरांना मिळाले पाणी!

नवीन जलवाहिन्यांची तात्पुरती दुरुस्ती

धाटाव : प्रतिनिधी

नवीन जलवाहिन्यांच्या फुटलेल्या भागाची तात्पुरती दुरुस्ती केल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी तडफडणार्‍या रोह्यातील नागरिकांना तब्बल सहा दिवसांनी पाणी मिळाले. मात्र नव्या आणि जुन्या जलवाहिन्यांचा ताळमेळ जुळत नसल्याने पाणीपुरवठा धीम्या गतीने सुरू करण्यात आला आहे.

रोहा नगरपालिकेने सुमारे 12 कोटी रुपये खर्च करून डोलवहाळ ते रोहे या जलवाहिनीचे काम नव्याने केले. गेल्या बुधवारी रोहा-कोलाड मार्गावरील क्लॅरियंट कंपनीजवळ या जलवाहिनीला पुन्हा एकदा भगदाड पडले. त्यामुळे रोहा शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र नव्या आणि जुन्या जलवाहिनीचा योग्य ताळमेळ बसत नसल्याने दुरुस्तीनंतरही जलवाहिनीला कुठे ना कुठे गळती लागत होती. जलवाहिनीच्या फुटलेल्या भागांच्या दुरुस्तीचे काम कसेबसे पूर्ण केल्यानंतर रोहा नगरपालिकेने सहाव्या दिवशी सकाळी टप्प्याटप्प्याने शहरात पाणी सोडण्यास सुरूवात केली. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी तडफडणार्‍या रोहेकरांचा जीव  भांड्यात पडला. मात्र अजूनही शहरात कमी दाबाने अपुरा पाणी पुरवठा होत आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply