नगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन
खालापूर : प्रतिनिधी
येथील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. त्याबाबत पत्रव्यवहार करुनदेखील पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शहरातील समस्या त्वरित सोडवाव्यात या मागणीसाठी ‘आम्ही खोपोलीकर आमचं ठरलंय‘ या सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवार (दि. 22)पासून पालिका कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.
खोपोली शहराच्या विविध भागातील नागरिकांनी एकत्र येवून ‘आम्ही खोपोलीकर आमचं ठरलयं‘ ही सामाजिक संघटना स्थापन केली आहे. शहरातील विविध नागरी समस्या त्वरित या मागणीसाठी या संघटनेने बुधवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. शहरातील अनेक तरुण या अंदोलनामधे सामील झाले असून, शहरातील नागरी समस्या पालिकेने त्वरित सोडविल्या नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
नगरसेवक किशोर पानसरे, अमोल पाटील, खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे यांच्यासह काही सामाजिक संघटनांनी आम्ही खोपोलीकर आमच ठरलय या संघटनेच्या धरणे आंदोलनाला यावेळी पाठिंबा दिला.