सचिन पाटील प्रशिक्षकपदी
अलिबाग ः प्रतिनिधी
मिस्टर इंडिया राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठव संघात रायगडच्या संदीप उले याची निवड झाली. याचबरोबर रायगडचेच सचिन पाटील यांची महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशनच्या विद्यमाने कोकण बॉडीबिल्डिंग असोसिएशन व फिटनेस फिझीक्यू स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या यजमानपदाखाली अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात 13वी महाराष्ट्र राज्य शरीरसौष्ठव निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. यातून महाराष्ट्राचा 12 जणांचा संघ निवडण्यात आला. हा संघ तेलंगणामधील खंमम येथे होणार्या 13व्या मिस्टर इंडिया स्पर्धेत सहभागी होईल.