Breaking News

हरविलेले बालक पोलिसांकडून पालकांकडे सुपूर्द

पनवेल : वार्ताहर

कामोठे वसाहत परिसरात हरविलेल्या चार वर्षीय मुलाला पोलिसांनी शोधून काढून तत्काळ मुंडेकर कुटुंबियांच्या ताब्यात दिल्यावर त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. कामोठे वसाहतीतील सेक्टर 12 गगनगिरी सोसायटी येथे राहणार्‍या मुंडेकर कुटुंबियांचा चार वर्षीय मुलगा उदय हरविल्याने त्यांनी याबाबत तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुरवाडे, पोलीस हवालदार होवाळ बीट मार्शल 3 वरील अमलदार पोलीस नाईक  म्हात्रे व पोलीस नाईक पवार व पोलीस नाईक भोई, महिला पोलीस अंमलदार भोर यांनी हरविलेला उदयचा शोध घेण्यास सुरूवात केली. खास खबर्‍यांमार्फत तसेच इतर नागरिकांच्या सहकार्याने हरविलेला मुलगा सेक्टर 21 प्लॉट नंबर 45, 46 कामोठे येथे असल्याची माहिती मिळाल्यावर त्या ठिकाणी पोलिसांचे पथक गेले व त्यांनी या मुलाला ताब्यात घेवून वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील यांच्या साक्षीने त्याच्या आईवडिलांकडे सुपूर्द केले.

Check Also

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …

Leave a Reply