उरण : रामप्रहर वृत्त
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शुक्रवारी (दि. 24) नगरपालिका मैदान, सातरहाटी उरण येथील मैदानाची स्वच्छता करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बळीराम एम. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्वच्छता अभियानात मैदानावरील केरकचरा, बॉटल्स, इतर घाण साफ करण्यात आली व मैदान स्वच्छ करण्यात आले. या स्वच्छता अभियानात प्रा. एच. के. जगताप, प्रा. डॉ. एम. जी. लोणे, प्रा. डॉ. ए. आर. चव्हाण, प्रा. लिफ्टन कुमारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. डी. पी. हिंगमिरे व राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.