खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त
खांदा कॉलनीमधील रस्ते, गटारे, पदपथ यासारख्या अनेक नागरी समस्यांसंदर्भात नगरसेवक एकनाथ गायकवाड, मनोहर म्हात्रे आणि नगरसेविका सीताताई पाटील यांनी सिडकोच्या अधिकार्यांसोबत शनिवारी (दि. 25) पाहणी केली. या वेळी सिडको अधिकार्यांनी ही कामे येत्या आठ दिवसांमध्ये पूर्ण करू, असे आश्वासन दिले.
खांदा कॉलनीतील रस्ते, गटारे, पदपथ यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. त्यासंदर्भात भाजपच्या खांदा कॉलनीतील नगरसेवकांनी सिडको अधिकार्यांसोबत चर्चा केली. त्यानुसार शनिवारी सिडको अधिकार्यांनी नगरसेवक एकनाथ गायकवाड, मनोहर म्हात्रे, नगरसेविका सीताताई पाटील यांच्यासह भाजपच्या पदाधिकार्यांसोबत सर्व सेक्टरमध्ये पाहणी केली. या वेळी अनेक सूचना अधिकार्यांना केल्या. त्यानुसार अधिकार्यांनी या सर्व समस्यांबाबत युद्धपातळीवर काम करून येत्या आठ दिवसांमध्ये कामे पूर्ण करू, असे आश्वासन दिले. या वेळी सिडकाचे अधिकारी ए. सी. मोहिले, कार्यकारी अभियंता बनकर साहेब, भाजप नेते भीमराव पोवार, शहर उपाध्यक्ष गोपीनाथ मुंडे, प्रवीण भोसले आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.