Breaking News

जनजागृती ग्राहक मंचच्या जिल्हाध्यक्षपदी मंगेश माळी

अलिबाग : अलिबाग

रायगड जिल्हा जनजागृती ग्राहक मंच या संस्थेच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते मंगेश माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर जिल्हा सचिवपदी खोपोलीचे नितीन पाटील आणि खजिनदारपदी अलिबागचे विशाल राऊळ यांची निवड झाली. संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक रविवारी (दि. 26) पेण येथील गांधी वाचनालयात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रशेखर मेहर (खारघर) यांच्या उपस्थितीत झालेल्या या निवडणुकीत उपाध्यक्षपदी बी. पी. म्हात्रे (पनवेल), सुनील वैद्य (रसायनी) आणि गणेश जोशी (पेण) यांची, तर सहसचिवपदी परमानंद कलगुटक (उरण), रामानंदन  पाटील (खालापूर) आणि सखाराम शिनगे (कर्जत) यांची निवड करण्यात आली. संस्थेचे संपर्क व प्रसिद्धी प्रमुख म्हणून संतोष विचारे (पनवेल) यांची निवड झाली. या वेळी 25 सदस्यांची जिल्हा कार्यकारिणीही निवडण्यात आली. संस्थेच्या वतीने ग्राहक संरक्षण कायदा 2019चा प्रचार आणि प्रसार करणार असल्याचा मनोदय जिल्हा अध्यक्ष मंगेश माळी यांनी या वेळी व्यक्त केला.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply