Breaking News

उरणमध्ये जनआरोग्य ई-कार्ड शिबिर

उरण : वार्ताहर

उरण नगरपरिषदेवतीने व कॉमन सर्व्हिस सेंटर कोप्रोली (सी.एस.सी)च्या स्मिता म्हात्रे यांच्या सहकार्याने आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंतर्गत ई-कार्ड उपलब्ध करून घेण्याकामी निवड झालेल्या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी सोमवारी (दि. 16) व मंगळवारी (दि. 17) या दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविंद्र कोळी, गट नेते रवी भोईर, भाजपा शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, मुख्याधिकारी अवधूत तावडे व कर्मचारी वृंद उपस्थित होते.  हे शिबिर यशस्वी होण्यासाठी धनंजय आंब्रे, मधुकर भोईर, महेश जाधव, हर्षद कांबळे, जयवंत जाधव, प्रशांत पाटील, विजय पवार, दत्ता मोरे या कर्मचार्‍यांनी शहरातील लाभार्थ्यांमध्येे  विशेष जनजागृती केली. दोन दिवसीय शिबिरात  700 पेक्षा अधिक लाभार्थ्यांची नोंदणी झाली. तसेच शहरातील उर्वरीत लाभार्थ्यांना नोंदणी करता यावी यासाठी नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष  वतीने शुक्रवारी (दि. 20) ते रविवार पर्यंत तीन दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत उरणच्या भाजप कार्यालयात शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराचा व योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सायली म्हात्रे यांनी केले आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply