Breaking News

घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन; भंडारी बहुद्देशीय संस्था आणि रोटरी क्लब पनवेलचा उपक्रम

अलिबाग ः प्रतिनिधी

अगदी काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची घरोघरी लगबग सुरू झाल्याचे पाहायला मिळते. कोरोनाच्या काळातही भाविकांचा उत्साह कुठेही कमी झालेला नाही. आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी घरोघरी सजावट सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भंडारी बहुद्देशीय सामाजिक संस्था अलिबाग व रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे रायगड जिल्ह्यामध्ये घरगुती गणेशोत्सव व सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या घरातील गणेशमूर्तीचा व सजावटीचा फोटो किंवा व्हिडीओ स्वतःच्या माहितीसह दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप किंवा मेल करायचा आहे. स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसून संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी मातीपासून बनवलेली मूर्ती, रांगोळी स्वरूपातील, चित्र स्वरूपातील तसेच धान्यापासून साकारण्यात आलेली मूर्ती, पाण्यावरील रांगोळी किंवा नैसर्गिक वस्तू स्वरूपातील रांगोळी हे सर्व ग्राह्य धरले जातील. स्पर्धेसाठी कोणतीही वयाची अट नसून सहभागी होण्याचा कालावधी 25 ऑगस्टपर्यंत आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपला फोटो किंवा व्हिडीओ onlineganpaticontest@gmail.com या मेल आयडीवर पाठवावा किंवा अलिबाग- दर्शन पारकर 9209751626, ़सुनील पेडणेकर 9324335561, समीर पेडणेकर 8007000811, राजेश बाष्टे 8975955957, निखिल राऊत 9209969591, निशिकांत बना 9011110174, पेण-पनवेल- शामला कुलकर्णी 8097891790, अलका कोळी-तोडणकर 9762771003, मुरूड-संतोष रांजणकर 9423376986, उषा खोत 9270298978, आर्यन पाटील 9284809779, विघ्नेश वाडकर 7776092888, श्रीवर्धन-म्हसळा- सुधाकर पाटील 9272717513, संतोष शिलकर 7798995220, पंकज रीळकर 9049101191 या नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …

Leave a Reply