Breaking News

धाटाव येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

रोहे : प्रतिनिधी

एम. बी. मोरे फाउंडेशनच्या धाटाव येथील महिला  महाविद्यालयाच्या करिअर मार्गदर्शन समिती तर्फे बुधवारी (दि. 29) विद्यार्थिनींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गोरेगाव पोलीस ठाण्याचे सागर गणेश कातूर्डे यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम, चालू घडामोडी, तलाठी, रेल्वे पोलीस, बँकींग इत्यादी परीक्षांसंदर्भात महत्वाची माहिती दिली. प्राचार्य प्रा. प्रसन्ना म्हसळकर आणि महाविद्यालयातील करिअर मार्गदर्शन कक्षाच्या प्रमुख प्रा. दर्शना शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सूत्रसंचालन प्रा. हणमंत ढवळे यांनी केले. या मार्गदर्शन सत्राला प्रा. मयूर पाखर यांच्यासह 120 विद्यार्थिनी उपस्थित होत्या.   आभार प्रदर्शन प्रा. नरेश घाग यांनी केले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply