Breaking News

राज्यात बुधवारपासून संचारबंदी

15 दिवसांसाठी कडक निर्बंध

मुंबई ः प्रतिनिधी
राज्यात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा एकदा संचारबंदी आणि कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत संचारबंदीची घोषणा केली. ही संचारबंदी 15 दिवसांसाठी असेल व बुधवारी (दि. 14) रात्री 8 वाजल्यापासून त्यांची अंमलबजावणी होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
याबाबत सविस्तर माहिती देताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, या काळात अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद राहतील. सकाळी 7 ते रात्री 8 या काळात अत्यावश्यक सेवाच चालू राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद केली जाणार नाही. लोकल, बस सुरू राहतील, पण त्या अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा देणार्‍या वर्गाला येण्या-जाण्यासाठी चालू राहतील.
पावसाळ्याची कामे पावसाळ्यापूर्वीच करावी लागतात. ती कामे चालू राहतील. बँका सुरू असतील. दूरसंचार सेवा आणि त्यांच्याशी संबंधित देखभाल सेवा सुरू राहतील. अधिसूचनाधारक पत्रकारांना मुभा देण्यात आली आहे. इंधन सेवा सुरू असतील. बांधकाम साईट्सवर मजुरांची राहण्याची सोय करावी अशी बांधकाम व्यावसायिकांना विनंती आहे, असे सांगून हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यामधून होम डिलिव्हरी आणि टेक अवे यालाच परवानगी असेल. तिथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे लसीकरण बंधनकारक असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचे विशेष सन्माननीय सदस्यत्व प्रदान

पनवेल : प्रतिनिधी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त संघाच्या पत्रकार भवनातील सभागृहात शुक्रवारी (दि.21) …

Leave a Reply