Breaking News

नेरळमध्ये हुतात्म्यांना अभिवादन

कर्जत : बातमीदार

हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्यासह गोमाजी पाटील यांनी शांत असलेल्या माणसाला जगण्याची आणि प्रसंगी आक्रमक होण्याची शिकवण दिली. त्यामुळेच माझ्याकडून स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसर्‍याचे प्राण वाचविण्याची हिम्मत निर्माण झाली, असे प्रतिपादन शूरवीर मयूर शेळके यांनी गुरुवारी (दि. 30) नेरळ येथे केले. नेरळ येथील कोतवालवाडी ट्रस्टच्या माध्यमातून हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचा बलिदान दिवस तिथीप्रमाणे साजरा केला जातो. वांगणी रेल्वे स्थानकात स्वतःचा जीव धोक्यात घालून मयूर शेळके या रेल्वे कर्मचार्‍याने लहान बाळाला वाचवले होते. याच मयूर शेळके यांच्या हस्ते गुरुवारी  पहाट कोतवालवाडीमध्ये क्रांतीज्योत प्रज्वलित करण्यात आली. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात शेळके बोलत होते. हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्यामुळेच आपल्याला आयुष्यात संघर्ष करण्याची प्रेरणा मिळाली. त्यातून माझ्या हातून लहान मुलीचे प्राण वाचविण्याचे कार्य झाले, असे त्यांनी सांगितले. नेरळ विद्या मंदिर, नेरळ विद्या विकास आणि कोतवालवाडी ट्रस्टमधील माजी विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर करून या वेळी हुतात्म्यांना अभिवादन केले.कोतवालवाडी ट्रस्टच्या व्यवस्थापकीय संचालक आणि जि.प. सदस्या अनसूया पादीर, नेरळच्या सरपंच उषा पारधी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply