Breaking News

डॉ. चिंतामणराव देशमुख आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

रोहे : प्रतिनिधी

कोएसोच्या रोहे येथील डॉ. सी. डी. देशमुख वाणिज्य व सौ. के. जी. ताम्हाणे कला महाविद्यालय आणि सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. चिंतामणराव देशमुख आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी डॉ.  सी.  डी. देशमुखांचे आर्थिक विचार,  कौशल्य विकास आणि युवक, कोविडोत्तर जग : आव्हाने आणि संधी, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य ः काळाची गरज, ऑनलाइन शिक्षण : संधी आणि अडथळे, शेतकर्‍यांची दैन्यावस्था व पेटलेली आंदोलने आणि स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हे विषय देण्यात आले आहेत. या स्पर्धेचा निकाल 14 जानेवारी 2022 रोजी घोषित करण्यात येणार आहे. तर बक्षीस वितरण समारंभ 4 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी विनामूल्य प्रवेश असून स्पर्धेसाठी भाषेचे बंधन नाही. स्पर्धकांनी या स्पर्धेत व्हिडीओद्वारे आपण सहभागी व्हावे, स्पर्धकाने कोणत्याही एका विषयावर 5+2 मिनिटांचा व्हिडीओ बनवून 10 जानेवारी 2022 पर्यंत संयोजकांना या 9527765598 क्रमांकावर पाठवावा. एका कॉलेजमधील दोन स्पर्धकाला प्रवेश मिळेल. अशी माहिती सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे अध्यक्ष राजेश कापरे, प्राचार्य डॉ. अतुल साळुंके यांनी दिली. अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख डॉ. सम्राट जाधव (9987156996/9527765598) िीेष.ीराीरींक्षरवहर्रीं99सारळश्र.लेा./ लवलल2007सारळश्र.लेा यांच्याकडे संपर्क साधण्याचा आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply