Breaking News

कोरोनाच्या नियमांत सरत्या वर्षाला निरोप

रायगडकरांनी केले 2022चे उत्साहात स्वागत

अलिबाग : प्रतिनिधी

2021चे स्वागत जोरात करता आले नाही, त्यामुळे 2022च्या स्वागताची तयारी करणार्‍या रायगडकरांच्या नियोजनावर अखेर पाणी पडले. कोरोनाच्या ओमायक्रॉनने विळखा घट्ट केल्याने नियमांचे बंधन आले परिणामी रायगडकर आणि मुंबई-पुण्यातील पर्यटकांना अगदी साधेपणाने सरत्या वर्षाला निरोप द्यावा लागला, मात्र 2022चे स्वागत फटाक्यांची आतषबाजी करून उत्साहात झाले.

कोरोनाने गेली दोन वर्षे जगण्याची परिभाषा बदलून टाकली आहे. जरा कुठे मोकळा श्वास घेण्याचा प्रयत्न होतो, तोच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची चाहूल लागते. त्यामुळे धावते जग पुन्हा थांबते. अल्टा, डेल्टा आणि आता ओमायक्रोन, असा कोरोनाचा वाढता प्रवास वेगाने सुरू झाला आहे. त्यामुळे कडक निर्बंधांच्या बेडीत पुन्हा अडकावे लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून रात्री जमावबंदीचे आदेश काढण्यात आले. त्याचा परिणाम थर्टी फस्ट सेलिब्रेशनवर झाल्याचे शुक्रवारी पहायला मिळाले.

दरवर्षी नवीन वर्षाच्या स्वागता करीत रायगडच्या पर्यटन स्थळावर देशी-विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करता असतात.

अलिबाग, मुरूड, नागाव, काशीद, वरसोली, किहीम या प्रमुख समुद्र किनार्‍यावर असलेली हॉटेल्स, रिसॉर्ट, लॉज यांचे आरक्षण एक महिना अगोदर होते.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची तीव्रता कमी झाल्याने सर्व नियम शिथिल झाले होते. लसीकरण ही मोठ्या प्रमाणात झाल्याने पर्यटक बिनधास्त होते. 31 डिसेंबरच्या माध्यमातून चार पैसे जास्तीचे हातात येतील अशी सर्व व्यावसायिकांची अपेक्षा होती, पण मागील काही दिवसांत ओमायक्रॉनने विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे निर्बंधदेखील घट्ट होऊ लागले.

रात्री 9 नंतर रस्त्यावर घोळक्याने फिरण्यावर बंदी घातल्याने 31 डिसेंबरच्या रात्री रस्ते नेहमीपेक्षा सुने होते. हॉटेल, रिसॉर्टमध्ये न्यू इअर सेलिब्रेशन पार्टीचे तुरळक ठिकाणी आयोजन केले होते. काही पर्यटकांनी आपले आरक्षण रद्द केले, परिणामी शुक्रवारी थर्टी फस्ट नाईट कोरोनाच्या सावटा खाली सरली, मात्र रात्री 12.00 नंतर फटाक्यांची आतषबाजी करून नवीन वर्षाच्या स्वागताचा आनंद रायगडकरांनी लुटला.

Check Also

खांदा कॉलनीत महिलांसाठी मॅरेथॉन

आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखवला हिरवा झेंडा पनवेल ः रामप्रहर वृत्त स्व. संजय दिनकर भोपी …

Leave a Reply