पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील विहिघर येथे नववर्षाच्या पहिल्या दिवशी साईबाबा मूर्ती स्थापना वर्धापन दिन सोहळा, सत्यनारायणाची महापूजा, तसेच चिपळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश पंढरीनाथ फडके यांच्या वाढदिवस समारंभानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (दि. 1) करण्यात आले होते. या कार्यक्रमांना अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमांदरम्यान सकाळी 8 वाजता श्री साईबाबा मूर्ती स्थापना वर्धापन दिन व अभिषेक, दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कुस्त्यांच्या दंगली, आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या कार्यक्रमांना माजी सरपंच तथा महाराष्ट्र बैलगाडी रेस संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके, गुरुनाथ फडके, चिपळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश फडके, हीताश डेव्हलपर्सचे अक्षय फडके, उद्योजक संतोष पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेश काथारा, युवा कार्यकर्ते विश्वास पाटील, माजी सरपंच संदीप जळे, संदेश फडके, समीर खुटले, सरपंच अशोक गायकर, प्रशांत फडके, महेश म्हात्रे, शदत भगत, अविनाश शेळके, रेवन फडके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.