Breaking News

धाटाव ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलन

धाटाव : प्रतिनिधी

रोहा तालुक्यातील धाटाव येथील ग्रामस्थांनी शनिवारी (दि.1) ग्रामपंचायत कार्यालयासमोर एक दिवसीय ‘जबाब दो‘ धरणे आंदोलन केले. अनेक ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते.

धाटाव ग्रामपंचायतीच्या 14 डिसेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत प्रलंबित प्रश्नावर चर्चा न करता सरपंच व सचिव (ग्रामसेवक) यांनी काढता पाय घेतला होता. त्यामुळे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते. प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पुन्हा ग्रामसभा न घेतल्यास 1 जानेवारी रोजी ग्रामपंचायतीसमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्याचे निवेदन ग्रामस्थांनी रोहा पंचायत समिती, तहसील, प्रांत, जिल्हाधिकारी, रोहा पोलीस ठाणे यांना दिले होते. मात्र प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने धाटाव ग्रामस्थांनी शनिवार एक दिवसीय ‘जबाब दो‘ धरणे आंदोलन केले.

या आंदोलनाची प्रशासनाने योग्य दखल घ्यावी, अन्यथा 26 जानेवारी रोजी रोहा पंचायत समिती येथे होणार्‍या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात काळे कपडे परिधान करून निषेध नोंदवण्यात येईल, असा इशारा धाटाव ग्रामस्थ प्रशांत जाधव, सुशांत भोकटे यांनी या वेळी दिला.

ग्रामसभेचे चित्रीकरण करण्यात आले आहे. उपस्थितांनी अनेक विषयावर चर्चा न करता गोंधळ घालण्यात वेळ घालवला व लेखी अर्जही आले नव्हते. त्यामुळे आम्ही ग्रामसभा अर्धवट सोडली, असे बोलता येणार नाही. याबाबत वरिष्ठांनी केलेल्या चौकशीत आम्ही योग्य ती माहिती व उत्तरे दिली आहेत.

-दीपक दाजी चिपळूणकर, ग्रामसेवक, ग्रामपंचायत धाटाव, ता. रोहा

Check Also

सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक अडथळे दूर करीत काही महिन्यांत पूर्णत्वास येणार …

Leave a Reply