Breaking News

पनवेलमधील प्रसाद म्हात्रे यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश; आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे सक्षम नेतृत्व व कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन पनवेल महापालिका प्रभाग 18 येथील पटेल पार्कमधील प्रसाद चंद्रकांत म्हात्रे यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाची शाल देऊन त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वागत केले. भाजपच्या खांदा कॉलनी येथील कार्यालयात शनिवारी (दि. 21) झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास पनवेल शहर सरचिटणीस तथा नगरसेवक नितीन पाटील, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयूरेश नेतकर, भाजप पनवेल शहर सोशल मीडिया सेल संयोजक प्रसाद हनुमंते, सदस्य सचिन नाझरे, प्रभाग क्र. 18चे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, महेश सरदेसाई आदी उपस्थित होते. या वेळी प्रसाद म्हात्रे यांच्यासह प्रशांत मानकामे, आदेश पाटील, ऋषिकेश पंडित, शुभम पंडित, निलेश पाटील, सूर्यकांत पंडित, किशोर म्हात्रे, अरविंद नाईक, दिलीप राठोड, राजकुमार चव्हाण, सागर कांबळे, निखिल कांबळे, रोहित हातनोरे, विशाल शेडगे, सुरज जितेकर, प्रतोष झा, राहुल रणदिवे, यतीन रावल, अनिकेत गायकवाड आणि प्रविशाल म्हात्रे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. या सर्वांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply