Breaking News

श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी महायुतीचे योगदान

आदिवासी बांधवांशी साधला संवाद

कडाव : वार्ताहर   

मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या चौथ्या टप्यातील प्रचारात कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायतमधील आदिवासी बांधवांशी संवाद साधण्यासाठी डोंगर माथ्यावरील चिंचवाडी येथे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव तथा युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम यांनी हजेरी लावून सर्वांचीच मने जिंकली.

सिद्धेश कदम यांनी उपस्थित आदिवासी बांधवांबरोबर चर्चा करताना सांगितले की, या 17व्या लोकसभेच्या 33 मावळ लोकसभा निवडणुकीत समोरच्या नवख्या उमेदवाराची तुलना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याबरोबर होऊच शकत नाही हाच आपला विजय आहे. त्यामुळे आपल्या डोंगर माथ्यावरील रस्ते, पाणी आणि वीज या प्राथमिक सुविधांसह आपले सामाजिक जीवन अधिक सुखकर करण्यासाठी श्रीरंग बारणे यांना पुन्हा संसदेत पाठवा पुढे आपल्या विभागात अधिकची विकासकामे आणण्यासाठी आम्ही जातीने लक्ष घालू असे या प्रचार बैठकीत अश्वासित केले.

शनिवारी (दि. 27) दुपारी एक वाजता भर उन्हात आसळ ग्रामपंचायतमधील डोंगरमाथ्यावरील काही किलोमीटर अंतर पार करत तेथील जनतेशी संवाद साधला.  त्याप्रसंगी युवासेनेचे संपर्कप्रमुख वैभव थोरात यांनी सांगितले की, आमचे युवासेनेचे तथा कर्जत पंचायत समितीचे माजी  सभापती अमर मिसाळ यांचे आसळ ग्रामपंचायतीमधील  डोंगरमाथ्यावरील आदिवासी बांधवांसाठी केलेले पाणी पुरवठ्याचे योगदान मोठे आहे. तर, येथील आघाडीचे पार्थ पवार यांचे या मतदारसंघात आजचे कार्य काय आहे, असे विचारले तर आज त्यांच्या कार्यकर्त्यांना मतदारांसमोर सांगण्यासारखे काहीच नाही.

चिंचवाडी येथील प्रचार बैठकीसाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख संभाजी जगताप, जिल्हा युवाधिकारी मयुर जोशी, कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ, माजी तालुकाप्रमुख गजु वाघेश्वर, भाजपचे कर्जत विधानसभा सोशल मीडियाचे अध्यक्ष विलास श्रीखंडे, उपतालुकाप्रमुख बाबु घारे, अंकुश दाभणे, भाजपचे संतोष ऐनकर, काळुराम पाठेकर, विश्वास शेंडे, भालचंद्र श्रीखंडे आदींसह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply