Breaking News

शेडुंग महाविद्यालयात रंगल्या नृत्य व गाण्यांच्या स्पर्धा

मोहोपाडा : प्रतिनिधी

मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील शेडुंग जवलील सेंट विल्फ्रेड्स कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात इंटरकॉलजिएट नृत्य व गाण्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

हि स्पर्धा जी. डी. बढाया ऑडीटोरीयम सभागृहात घेण्यात आली. या वेळी खालापूर व पनवेल तालुक्यातील 49 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. कार्यक्रमाची सुरुवात नृत्यदिग्दर्शक अभिनेता भरत जाधव, गायक मयुरी कांडपेकर आणि विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिरुद्ध ऋषि यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देवून आभार मानण्यात आले. परिक्षक म्हणून भरत जाधव यांनी काम पाहिले.यात सोलो डान्स स्पर्धेत प्रथम -आदीती सालवी (यशवंतराव देशमुख ज्युनिअर कॉलेज, चौक), व्दितीय-राज कांबळे (सेंट विल्फ्रेड्स फार्मसी कॉलेज), तृतीय-मयुर लोखंडे, ग्रुप नृत्य स्पर्धां प्रथम-पुजा माने व ग्रुप (यशवंतराव देशमुख ज्युनिअर कॉलेज चौक), व्दितीय-साक्षी पवार व ग्रुप (यशवंतराव देशमुख ज्युनिअर कॉलेज), तृतीय-हर्षांली भोसले व ग्रुप (पि.एन.पी.वावोशी स्कुल) आदींनी आपापली कला सादर करुन पारितोषिक पटकावले. संस्थेचे सचिव डॉ. केशव बढाया यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले. हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तपस्या पाटील, सु. बी. नरगीस, सोहेल पटेल, सिमरन जैन व कौस्तुभ यांनी अथक परिश्रम घेतले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply