Breaking News

दुर्गम भागात मतदान केंद्रावरील विजेचा प्रश्न सुटला

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनविले सोलर पॅनल

कर्जत : बातमीदार

मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 29) मतदान घेतले जाणार आहे. त्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघातील सर्व 343 मतदान केंद्रावर मतदान शांततेत आणि व्यवस्थित पार पडावे, यासाठी निवडणूक  आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.दरम्यान, कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या चार पैकी तीन मतदान केंद्रामध्ये वीज नव्हती, तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी तात्पुरती व्यवस्था करून तेथील विजेचा प्रश्न सोडविला आहे.

 कर्जत विधानसभा मतदारसंघात 343 मतदानकेंद्र असून तेथे  मतदान यंत्र, अधिकारी व कर्मचारी यांची ने आण करण्यासाठी 117 वाहने तैनात करण्यात आली आहेत. दुर्गम भागातील कळकराई, ढाक, तुंगी आणि पेठ या चार मतदान केंद्रांवर वीजपुरवठा करण्यासाठी शेलू येथील आचार्य अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोलर पॅनल बसवून, तेथील विजेचा प्रश्न तात्पुरता सोडविला आहे.

पोलीस यंत्रणा सज्ज

लोकसभा निवडणुकीचे मतदान लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 343 मतदान केंद्र या ठिकाणी पोलीस तैनात असतील त्याचवेळी पोलिसांचे फिरते पथक हे कर्जत आणि खालापूर तालुक्यात 12 वेगवेगळ्या भागात तैनात असणार आहेत. किमान 1000 पोलीस आणि त्यांच्या मदतीला राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या आणि सीआरपीएफचे कमांडो लक्ष ठेवून असणार आहेत. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावेत, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अनिल धेरडीकर यांनी केले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply