Breaking News

खाकी वर्दीलाही कोरोनाचा विळखा

नवी मुंबईत चार दिवसांत तब्बल 1390 पोलीस पॉझिटिव्ह

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

राज्यात सध्या कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा कहर सुरू आहे, राज्यातली रोजची रुग्णसंख्या पुन्हा 40 हजारांच्या पुढे गेली आहे, लोकांच्या सुरक्षेसाठी रात्र दिवस तैनात असणार्‍या, कोरोनाकाळात तुमच्या आमच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी रस्त्यावर उतरणार्‍या खाली वर्दीलाही कोरोनाचा विळखा वाढतोय, कोरोनाचा प्रादुर्भाव नवी मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनाही मोठ्या प्रमाणात झाला आहे. चार दिवसांत 180 वरिष्ठ अधिकार्‍यांसह 1210 पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झालीय. एकूण 1390 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 30 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. मुंबईतल्या दोन पोलीस कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्युही झाल्याचे समोर आले आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेच्या वेळी 15 अधिकार्‍यासह कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला होता. तर 186 अधिकारी आणि 1243 कर्मचार्‍यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली. दरम्यान, नवी मुंबई शहर पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंतेची वातावरण आहे. त्याच दरम्यान, गेल्या चार दिवसांत ज्या पोलिसांना कोरोना झाला आहे त्यातील काही जणांवर विविध रुग्णालयांमध्ये तर इतर अधिकारी आणि कर्मचार्‍यांना गृहविलगीकरणात उपचार करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपयुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली. पोलीस आयुक्तालयात चिंतेचे वातावरण आहे.

नवी मुंबईत रविवारी (दि. 9) दोन हजार 337 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 316 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिलासादायक बातमी असे आहे की, कोरोनामुळे एक हि मृत्यू नाही. सध्या नवी मुंबईत अ‍ॅक्टिव्ह रुग्ण 11147 आहे. तर नवी मुंबईमध्ये दिवसात रुग्ण दुपट संख्यने वाढत आहे, त्यामुळे नवी मुंबई पालिका बंद असलेली ऑक्सिजन बेड कोविड सेंटर पुन्हा सुरू केली आहेत.

कायदा आणि सुव्यस्था राखण्यासाठी पोलिसांना घराच्या बाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नाही, मात्र त्यामुळेच खाकी पुन्हा कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे, फक्त कर्मचार्‍यांचा नाही तर त्यांच्या कुटुंबीयांचाही धोका यामुळे वाढला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply