Breaking News

पनवेलमध्ये मंदिरांतील आरती बंद

पनवेल : वार्ताहर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या श्री साई नारायण बाबा मंदिरात तसेच गावदेवीपाडा येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये मोठ्या प्रमाणात भक्तगण दर गुरुवारी पुजा-अर्चा व आरतीसाठी जमत असतात. परंतु शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील मंदिरातील देवदर्शन व आरती बंद ठेवण्यात आली होती. श्री साई नारायण बाबा मंदिर येथील भक्तगणांसाठी गुरुवारी दर्शन बंद ठेवण्यात आले होते. मुख्य दरवाजावरच या संदर्भातील विनंती-सूचना लावण्यात आली होती. त्यामुळे लोकांनी बाहेरुनच साईबाबांचे दर्शन घेतले. तशाच प्रकारे श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती सुधाकर घरत यांनी सुद्धा भक्तांना आरतीसाठी उपस्थित राहू नये व दर्शनासाठी गर्दी करून नये, असे आवाहन केले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply