Breaking News

चांदई संघाने केपीएल जिंकली; खांडस संघ उपविजेता

कर्जत ः रामप्रहर वृत्त
कर्जत प्रीमियर लीगमध्ये चांदई सुपर किंग्ज संघाने विजेतेपद पटकावले, तर आगरी वॉरियर्स खांडस संघ उपविजेता ठरला.
पाच दिवस कशेळे येथील मैदानावर रंगलेल्या या स्पर्धेत एकूण 20 संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामना खांडस आणि चांदई या संघांमध्ये झाला. यात चांदई संघाने बाजी मारली. या संघात नितीन धुळे, शुभम बेलोसे, केदार भगत, मंगेश खेडेकर, संभाजी पथारे, विपूल ऐनकर, राहुल ऐनकर, कैलास मुणे, संदीप काळण, हरिभाऊ दहिफळे, किशोर भोईर, राहुल शिंगाडे यांनी आपल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली, तर खांडस संघाचे मालक हरिश्चंद्र पांडुरंग भोईर व सुरेश दत्तात्रय ऐनकर यांनी आपल्या संघाचे नेतृत्व प्रवीण पथारे व उपकर्णधार संदीप हजारे यांच्याकडे सोपवले होते. त्यांचा संघ उपविजेता ठरला. विजेते संघ आणि विशेष कामगिरी बजावणार्‍या खेळाडूंना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply