मदतीसाठी उभारणार फंड
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
देशभरात कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे हाहाकार माजला असून, जगभरातून भारतासाठी मदत मिळत आहे. जगविख्यात बुद्धिबळ चॅम्पियन विश्वनाथ आनंद कोरोनाविरुद्धच्या सरसावला असून, तो मदतीसाठी फंड उभारणार आहे.
पाचवेळा विश्वचॅम्पियनचा खिताब मिळवलेला विश्वनाथ कोरोना संकटात मदतीनिधी उभारण्यासाठी ऑनलाइन बुद्धिबळ खेळणार आहे. दुसर्या जगविख्यात स्पर्धकांसमवेत तो सामना खेळणार आहे. चेज डॉट कॉम ब्लिट्जधारक किंवा दोन हजारांपेक्षा कमी फिडे रेटींगवाले खेळाडू 150 डॉलर दान देऊन आनंद यांच्यासमवेत सामना खेळू शकणार आहेत, तर इतर ग्रॅँडमास्टर्ससोबत खेळण्यासाठी 25 डॉलर द्यावे लागणार आहेत. सायंकाळी 7.30 वाजता हे सामने चेस डॉट कॉमवर प्रसारीत केले जातील, असे वेबसाइटने सांगितले.
बुद्धिबळाच्या या सामन्यात आनंद यांच्यासमवेत कोनेरू हम्पी, डि हरिका, निहाल सरीन आणि पी. रमेशबाबू हे दिग्गज खेळाडू भाग घेणार आहेत. या सामन्यातून जमी होणारा संपूर्ण पैसा रेडक्रॉस इंडिया आणि भारतीय बुद्धीबळ महासंघ यांच्या चेकमेट कोविड अभियानासाठी देण्यात येणार आहे.
बुद्धिबळ महासंघातर्फे हा छोटासा प्रयत्न आहे. आपण सर्वांनी उत्फुर्तपणे यात सहभाग नोंदवावा, असे आवाहनही आनंद याने केले आहे.