पनवेल : रामप्रहर वृत्त
नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ यांचा वाढदिवस मंगळवारी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा झाला. वाढदिवसानिमित्त नवीन पनवेल येथे नॅशनल हेल्थ कार्ड आणि ई-श्रम कार्ड वाटप कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, नगरसेवक तेजस कांडपिळे, राकेश भुजबळ, मच्छिंद्र पाटील, नितीन भुजबळ, अजित लोंढे, किशोर शिंदे, भरत भुजबळ, सिद्धेश भुजबळ आदी उपस्थित होते.