कर्जत ः बातमीदार
पेण अर्बन बँकेत शेकडो ठेवीदार, खातेदारांचे पैसे अडकले आहेत. गेली 11 वर्षे बँक संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलने केली जात आहेत. या लढ्याचा एक भाग म्हणून शनिवारी (दि. 15) कर्जतमध्ये सह्यांची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तब्बल 1300 नागरिकांनी सह्या करून आपला पाठिंबा दिला.
केंद्र सरकारने नव्याने केलेल्या कायद्याप्रमाणे पाच लाखांच्या ठेवीपर्यंत संरक्षण देण्यात आले आहे. त्याचे आधारे पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना संरक्षित करून त्यांचे पैसे परत द्यावे यासाठी सुनील गोगटे यांच्या पुढाकाराने कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात राबविण्यात आली.
या वेळी संजय कराळे, बळवंत घुमरे, प्रकाश पालकर, मयूर शितोळे, स्नेहा गोगटे, प्रीती तिवारी, विजय कुलकर्णी, दिनेश गणेगा, सर्वेश गोगटे, सूर्यकांत गुप्ता, रजनी वैद्य, संगीता समीर सोहोनी, सागर खडे, गोडबोले, दिनू वैद्य आदी उपस्थित होते.
Check Also
शेकापचा माजी नगरसेवक सुनील बहिराच्या पोलीस कोठडीत वाढ
पनवेल : रामप्रहर वृत्त प्रॉपर्टीसाठी मयत वडिलांचे खोटे शपथपत्र बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल तक्का …