Breaking News

नवी मुंबईत 122 पैकी 25 प्रभाग ओबीसींचे महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर

नवी मुंबई : बातमीदार

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या उपस्थितीत ओबीसी, ओबीसी महिला व सर्वसाधारण (महिला) आरक्षण सोडत प्रक्रिया कडक पोलीस बंदोबस्तात झाली.

नवी मुंबई महानगरपालिकेत पॅनलमध्ये अनेकांना फटका बसला आला तरी एका पॅनलमध्ये तीन प्रभाग असल्याने त्यापैकी तिसरा क प्रभागा हा सर्वसाधारण महिला व पुरुषांसाठी ठेवण्यात आल्याने ती एकप्रकारची राजकीय सोयच मानली जात आहे. नव्या प्रभाग रचनेत वॉर्ड फुटल्याने अनेक ठिकाणी ओबीसी समाज विखूरला गेला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी ओबीसी आरक्षण तर आधी जिथे आरक्षण होते तो वॉर्ड सर्वसाधारण झाल्याचे पाहायला मिळाले.यात काही जणांचे प्रभाग आरक्षित झाल्याने आता कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवता येईल किंवा आपल्या प्रभागात कोणता उमेदवार उभा करता येईल याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

सर्वसाधारण महिला आरक्षण – एकूण 41 प्रभाग हे खुले प्रभाग असतील. त्यापैकी एकही महिला नसलेल्या पॅनल मधील थेट 21 प्रभागांमध्ये थेट आरक्षण देण्यात आले. यात प्रभाग क्रमांक 17(अ), प्रभाग क्रमांक 13(अ), प्रभाग क्रमांक 26(अ), प्रभाग क्रमांक 36(अ), प्रभाग क्रमांक 3(ब), प्रभाग क्रमांक 7(बी), प्रभाग क्रमांक 8(बी), प्रभाग क्रमांक 9(बी), प्रभाग क्रमांक 12(बी), प्रभाग क्रमांक 18(बी), प्रभाग क्रमांक 19(बी), प्रभाग क्रमांक 22(बी), प्रभाग क्रमांक 23(बी), प्रभाग क्रमांक 28(बी), प्रभाग क्रमांक 29(बी), प्रभाग क्रमांक 31(बी), प्रभाग क्रमांक 32(बी), प्रभाग क्रमांक 34(बी), प्रभाग क्रमांक 37(बी), प्रभाग क्रमांक 39(बी), प्रभाग क्रमांक 35 (ब) प्रभागांचा समावेश आहे. 20 ठिकाणी सर्वसाधारण महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply