Breaking News

उरणमध्ये पूर्णत: लॉकडाऊन; बाजारपेठेत कडकडीत बंद

व्यापारी असोसिएशनचा पुढाकार

उरण : वार्ताहर
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी लागू आहे. तरीही कोेरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने उरण व्यापारी असोसिएशनने 11 ते 13 एप्रिलदरम्यान संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उरणमध्ये शनिवारी (दि. 11) शुकशुकाट दिसून आला.
उरण कोरोनामुक्त ठेवण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्यासोबत शुक्रवारी चर्चा करण्यात आली होती. या बैठकीस व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार महेश बालदी, उपाध्यक्ष कौशिक शाह, सेक्रेटरी हस्तीमल मेहता, सदस्य हितेश शाह, अजित भिंडे व इतर सदस्य उपस्थित होते. या वेळी वैद्यकीय सुविधा वगळता बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशनने घेतला. या निर्णयाचे पोलिसांनी स्वागत केले व आभार व्यक्त केले.
बाजारपेठ पुन्हा ज्या वेळी सुरू होईल त्या वेळी नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना पुरेसे अंतर
(सोशल डिस्टन्सिग) ठेवून नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी केले आहे.
दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी अशाच प्रकारे महाड आणि रोह्यात पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आलेले आहे.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply