Breaking News

तांबाटी येथे आरोग्य तपासणी शिबिर

खोपोली : प्रतिनिधी

कातकरी उत्थान कार्यक्रमांतर्गत खालापूर तहसील कार्यालय व तांबाटी ग्रुपग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आणि चौक येथील साई हॉस्पीटलच्या सहकार्याने नुकतच तांबाटी गावातील प्राथमिक शाळेत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. त्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार व प्रांताधिकारी अजित नैराळे यांच्या मार्गर्शनाखाली घेण्यात आलेल्या या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन खालापूरचे तहसीलदार आयुष तांबोळी यांनी केले. शिबिरात कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करुन  ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तांबाटी ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल जाधव, उपसरपंच सारिका लाड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, वावोशी मंडळ अधिकारी, तांबाटीचे ग्रामविकास अधिकारी, गोरठण खुर्दचे तलाठी व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply