Breaking News

श्रीसदस्यांच्या श्रमदानातून रेवदंडा समुद्रकिनारा स्वच्छ

रेवदंडा : प्रतिनिधी

श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या संयोजनातून हजारो श्रीसदस्यांच्या श्रमदानातून रेवदंडा समुद्रकिनारा नित्य स्वच्छ असल्याचे रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच मनीषा चुनेकर यांनी म्हटले.

रेवदंडा समुद्रकिनारी आठ, पंधरा व महिन्यामध्ये समुद्र किनारा, तसेच सुरूबन स्वच्छता मोहीम असंख्य श्रीसदस्यांच्या श्रमदानातून राबविली जाते. समुद्रकिनार्‍यावरील केरकचरा, अनावश्यक वाढलेली झाडेझुडपी अथवा प्लॅस्टिक बाटली गोळा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यात येते. रेवदंडा समुद्रालगत असलेल्या सुरूबन, तसेच नजीकचे हरेश्वर मैदान येथे स्वच्छता नित्यनेमाने सुरू असते. त्यामुळे रेवदंडा समुद्रकिनारा व सुरूबन नित्य स्वच्छ दिसते. याशिवाय रेवदंडा बाजारपेठेतील मुख्यः रस्ता, रेवदंडा शहरातील गल्लोगल्ली, स्मशानभूमी स्वच्छता नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाच्या वतीने नेहमीच केली जाते.

यासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाच्या वतीने ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी जातीने लक्ष देत असतात. रेवदंडा समुद्र किनारा, सुरूबन व रेवदंडा शहरातील स्वच्छतेने गाव स्वच्छ व सुंदर, तसेच सर्वांसाठी आकर्षक बनले आहे व नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या माध्यमातून असंख्य श्रीसदस्यांच्या श्रमदानातून रेवदंडा शहराला स्वच्छता लाभली आहे.

श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या माध्यमातून असंख्य श्रीसदस्यांच्या सहकार्याने रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छतेसाठी ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब  धर्माधिकारी देत असलेले योगदान फार मोठे आहे. रेवदंडा ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत, परंतु रेवदंडा शहरावर असेच प्रेम व आशीर्वाद ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे लाभावे, अशी मनोभावना रेवदंडा सरपंच मनीषा चुनेकर यांनी व्यक्त केली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply