Breaking News

गणेशोत्सव शांततेत साजरा करा

रसायनी पोलिसांचे आवाहन; मंडळांच्या पदाधिकार्‍यांसोबत बैठक

मोहोपाडा : प्रतिनिधी

गणेशोत्सव व इतर सण कायद्याचे पालन करुन शांततेत व गुण्यागोविंदाने साजरे करा, असे आवाहन रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांनी रसायनी पोलीस ठाण्याच्या सभागृहात झालेल्या शांतता कमिटी, पोलीस पाटील व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकार्‍यांच्या समन्वय बैठकीत केले.

जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे, उपविभागीय अधिकारी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे बोलत होते. या वेळी वरिष्ठ  निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे म्हणाले की, गणेशोत्सवात विद्युत रोषणाई करताना अपघात होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही बेवारस वस्तूंना हात लावू नये, शिवाय आपल्या एटीएमबद्दलची माहिती कोणी मागत असल्यास त्याला देऊ नये तसेच आपली वाहने बाजारात पार्किंग न करता काही अंतरावर ठेवून पायी चालल्यास व्यायाम होईल यामुळे वाहतूक कोंडीही टळेल, गणेशोत्सव हा सण शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. जनतेनेही या काळात शांतता व संयम राखावा. कोरोना पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात सर्वांनी मास्क वापरावा. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन डोंगरे यांनी केले.

आगामी सणांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस पाटीलांनी सतर्क राहावे. या वेळी शांतता कमिटी पदाधिकारी व सदस्य, पोलिस पाटील, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्या समस्या जाणून निराकरण करण्यात आले. या बैठकीला पोलीस उपनिरीक्षक धनाजी काळे, पोलीस नाईक विशाल झावरे यांच्यासह पोलीस कर्मचारी व रसायनी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply