अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या 21 जागांसाठी मंगळवारी (दि. 18) मतदानप्रक्रिया झाली. मतदारांनी शांततेत आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत 60 उमेदवार आपले राजकीय भवितव्य अजमावत असून 19 जानेवारीला मतमोजणी होईल.
जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर महिन्यात झाली, मात्र ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे या सहा नगरपंचायतींमधील ओबीसी प्रवर्गाच्या राखीव 21 जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. या जागा अनारक्षित करून त्यासाठी पुन्हा निवडणूक जाहीर करण्यात आली. पोलादपूर, म्हसळा, माणगाव, तळा, पाली या पाच नगरपंचायतींमध्ये प्रत्येकी चार, तर खालापूर नगरपंचायतीमधील एक अशा या 21 जागा असून त्यासाठी मंगळवारी मतदान झाले. या जागांच्या मतमोजणीअंती नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
Check Also
पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे
आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …