Breaking News

नाना पटोले यांना अटक करा

दक्षिण रायगड जिल्हा भाजपची मागणी

अलिबाग : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शिवराळ भाषेत टिका करणारे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी, अशी मागणी दक्षिण रायगड जिल्हा भाजपतर्फे पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. भाजप अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, आलिबाग शहर अध्यक्ष अ‍ॅड. अंकीत बंगेरा, ओबीसी सेल अलिबाग  तालुका  अध्यक्ष अशोक वारगे, तालुका संघटन सरचिटणीस संतोष पाटील, अजित भाकरे, कामगार आघाडी जिल्हा संयोजक रवींद्र पाटील, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा संयोजक निलेश महाडिक, युवा मोर्चाचे रोहित जाधव, तुषार भगत, अजिंक्य पाटील, निखिल चव्हाण, जगदीश घरत, समीर राणे, पांडुरंग झावरे, आतिश गायकवाड, प्रकाश पाटील, प्रशांत पाटील, अ‍ॅड. मानसी पाटील, हर्षल तांडेल, युगांत तबिब, मयुर झावरे आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

नाना पटोले यांना अटक करण्याची भाजपची मागणी

खोपोली : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानजनक व धमकी देणारे वक्तव्य करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवून त्यांना त्वरित अटक करावी, या मागणीचे निवेदन खोपोली भाजप तर्फे बुधवारी (दि. 19) पोलीस ठाण्यात देण्यात आले.

खोपोली शहर भाजपचे सरचिटणीस हेमंत नांदे, प्रमोद पिंगळे, चिटणीस सुमिता महर्षि, महिला मोर्चा सरचिटणीस  अश्विनी अत्रे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष सुनिल नांदे, बूथ अध्यक्ष सागर काटे, प्रदिप दळवी, प्रल्हाद अत्रे यांच्यासह कार्यकर्ते या वेळी उपस्थीत होते.

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply